‘निलेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणेने परिसर दुमदुमला
आचरा (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण मतदार संघातील उमेदवार निलेश राणे विजयी होताच चिंदर गावठणवाडी बूथवर फटाक्यांची आतिषबाजी करत आणि एकमेकांना पेढे भरवत विजयोत्सव साजरा करण्यात केला. ‘निलेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत परीसर दुमदुमुन सोडण्यात आला.
यावेळी भूषण पाताडे, बंटी भोवर, सुबोध गांवकर, सचिन जाधव, मिलिंद कासले, शेखर पालकर, भालचंद्र खोत, आण्णा कासले, सागर परब, आशीर्वाद तावडे, निलेश पवार, गिरीश पवार, भाई चिंदरकर, अमित कानविंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.