५८००६ मतांनी उबाठा उमेदवार संदेश पारकर यांचा केला पराभव
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली मतदारसंघातून ५८००६ मतांच्या मताधिक्याने निवडून येत नितेश राणीने यांनी आपल्या विजयाची हॅट्रिक साधली आहे. उबाठाचे प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश पारकर यांचा त्यांनी पराभव केला आहे. राणे यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष सुरू ठेवला आहे. शहर तसेच तालुक्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी होत आहे.