मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात १७व्या फेरीअखेर निलेश राणे हे ७१७३ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. जसजसे निवडणूक मतमोजणी फेरीचे निकाल बाहेर येत आहेत तसतसे मतदार संघाचे चित्र स्पष्ट होत आहे. सतराव्या फेरी अखेर निलेश राणे यांना 67240 मते, वैभव नाईक 60067 मते मिळाली आहेत. निलेश राणे यांना 7173 चे मताधिक्य मिळाले आहे.
१७वी फेरी; निलेश राणे ७१७३ मतांनी आघाडीवर












