दीपक केसरकरांचा चौकार…!

सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर ३९७२७ मतांनी विजयी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांनी ३९७२७ मतांनी विजय साजरा केला आहे. या विजयसोबतच केसरकर यांनी विजयाचा चौकार मारला आहे. सावंतवाडी मतदारसंघातून चौरंगी लढत रंगली होती. यात दिपक केसरकर यांनी 80,389 तर राजन तेली 40,662, विशाल परब 33,051 आणि अर्चना घारे यांनी 6019 मते मिळवली आहेत. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर विजयी झाल्यानंतर महायुतीच्या आणि भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!