सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर यांनी राजन तेली यांना पिछाडीवर टाकून ३९७२७ मतांची आघाडी मिळवली आहे. सावंतवाडी मतदारसंघातून चौरंगी लढत रंगली होती. यात दिपक केसरकर यांनी 80,389 तर राजन तेली 40,662, विशाल परब 33,051 आणि अर्चना घारे यांनी 6019 मते मिळवली आहेत.