९००६ मतांनी निलेश राणे विजयी
मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार वैभव नाईक यांना पराभवाचा धक्का देत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात २२व्या फेरीअखेर निलेश राणे यांनी आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. निलेश राणे हे ९००६ मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळत आहे.