वैभववाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत जनजागृती कार्यशाळेचे आयोजन

अतुल रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार कार्यशाळा

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वैभववाडी तालुका यांच्या वतीने उंबर्डे कातकरवाडी येथे जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 16 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता अतुल रबराणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. ग्रामसभा, माहितीचा अधिकार व महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम याविषयी शशिकांत पवार हे या जनजागृती कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेत ग्रामपंचायत, ग्रामसभा, महिला ग्रामसभा, प्रभाग सभा, मासिक सभा, सरपंच, उपसरपंच सदस्य, मतदार व ग्रामसेवक यांची कर्तव्य व अधिकार, माहितीच्या अधिकारात माहिती कशी मागवावी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती, शासनाचे विविध निर्णय व परिपत्रके, 14वा व 15वा वित्त आयोगाबाबत माहिती, आमचा गाव आमचा विकास आराखडा याबाबत माहिती देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!