कुडाळ (प्रतिनिधी) : भरधाव वेगात डंपर चालवून अपघात करुन रातोरात फरार झालेला डंपरचालक इजाज लालासाब बेजापी राहणारा बेळगांव याला मंगळवारी कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले. यात बेफिकीरपणे व अविचाराने वाहन चालवून अपघात केल्या प्रकरणी व स्वतः च्या दुखापतीस, वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांच्यावर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात रविवारी रात्री १२.३० ला झाला होता. कुडाळ वरून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एका डंपरचा तेर्सेबांबर्डे येथे रविवारी रात्री १२.३० वा. अपघात झाला होता. भरधाव वेगातील डंपर महामार्ग लगतच्या खोल भागात उलटला होता. यानंतर जखमी अवस्थेतील डंपरचालक घटनास्थळावरून पळून गेला होता. यानंतर कुडाळ पोलिसांनी या डंपर चालक इजाज लालासाब बेजापी राहणारा बेळगांव याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती कुडाळ पोलिस हनुमंत धोत्रे यांनी दिली आहे.












