शालेय पोषण आहार भरारी पथकाच्या वतीने शाळेची पाहणी
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील राज्यातील आदर्श मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळालेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेची आज शालेय पोषण आहार भरारी पथकाच्या वतीने पाहणी करण्यात आली.तसेच शाळेची संपूर्ण शालेय वार्षिक तपासणी शालेय पोषण आहार भरारी पथकाचे प्रमुख राजेंद्र प्रसाद गोविंद मनेरीकर यांच्या प्रमुख उपस्थित व मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी सावडाव केंद्रप्रमुख संतोष जाधव,जाणवली केंद्रप्रमुख के एम पवार, पियाळी केंद्रप्रमुख नारायण ओटवकर, कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार, बोर्डवे केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर,खारेपाटण केंद्र प्रमुख श्री सद्गुरू कुबल,बी आर सी चे विषय तज्ञ शिक्षक सचिन तांबे सर, नडगिवें जि.प. शाळेच्या पदवीधर शिक्षिका जयश्री शेट्ये, जि.प.उर्दू शाळा खारेपाटण चे मुख्यद्यापक रुबाब फकीर आदी मान्यवर शिक्षक यांचा या भरारी पथकामध्ये समावेश होता.
खारेपाटण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं.१ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी शालेय वार्षिक तपासणी करीता व शालेय पोषण आहार पाहणी करण्या करीता आलेल्या भरारी पथकातील सर्व मान्यवर शिक्षकांचा शाळेच्या वतीने पुषपगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. यावेळी भरारी पथकाद्वारे शाळेची दप्तर अभिलेख तपासणी, तसेच शैक्षनिक तपासणी व प्रत्यक्ष वर्ग तपासणी आणि शालेय परिसराची पाहणी व सहशालेय उपक्रमाची माहिती जाणून घेण्यात आली.
खारेपाटण केंद्र शाळा नं.१ ही शाळा राज्यातील आदर्श मॉडेल स्कूल शाळा असून शाळेतील सद्य स्थितीत असलेल्या भौतिक सुविधा व शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच शाळेत राबविण्यात येणारे उपक्रम विद्यार्थी हित लक्षात घेऊन समाजाला प्रेरणा देणारे आहेत.असे भावपूर्ण उद्गगार शालेय पोषण आहार भरारी पथकाचे प्रमुख राजेंद्र मनेरिकर यांनी यावेळी व्यक्त करत खारेपाटण केंद्र शाळेच्या एकूणच प्रगती विषयी समाधान व्यक्त केले.