मालवण भाजपची पोलीस ठाण्यात धडक : पदाधिकाऱ्यांनी मांडली आक्रमक भूमिका

कुडाळ (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरून मानहानी केल्याबद्दल मराठी माणसांना फसवणारा, भ्रष्टाचारी, छत्रपती घराण्याचा अपमान करणारा वाचाळवीर संजय राऊत यांचा भारतीय जनता पार्टी मालवण तर्फे जाहीर निषेध नोंदवण्यात आला. राणे साहेबांवर सूडबुद्धीने मानहानी वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात यावा. वाचाळवीर राऊत यांचा बंदोबस्त करण्यात यावा. व तात्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी आंदोलन छेडेल. अशी आक्रमक भूमिका मांडत मालवण तालुका भाजपच्या वतीने भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांना निवेदन देण्यात आले. संजय राऊत यांना तात्काळ अटक झाली पाहिजे असे सांगत अशोक सावंत यांनी आक्रमक भूमिका मांडली.

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनीही खासदार संजय राऊत यांच्या विरोधात संतप्त भुमिका मांडली. राणे साहेब आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल कोणी काहीही बोलत असेल तर ते सहन केले जाणार नाही. असे सुदेश आचरेकर यांनी सांगितले.

यावेळी भाजप तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, माजी नगरसेविका पुजा सरकारे, मालवण तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, संचालक आबा हडकर, सहकार आघाडीचे बबलू राऊत, कृषी आघाडी महेश सारंग, बाबू कदम, युवमोर्चा तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, निषय पालेकर, राकेश सावंत, राज कांदळकर, भोगावकर, कदम, रसिक, खोत, कासवकर यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

वडिलांवर कोणी बोलले तर मुलाने भावना मांडल्या तर त्यात गैर काय ?
माजी खासदार निलेश राणे हे वडिलांवर अतिशय प्रेम करतात. वडिलांवर कोणी बोलत असेल तर त्याला त्याच भाषेत त्यांनी उत्तर दिले त्यात गैर काय. आपल्या भावना त्यांनी मांडल्या. तर ठाकरे सेनेला मिरच्या का झोम्बल्या. आपण काहीही बोलायचे आणि दुसऱ्याने प्रत्युत्तर केले तर ते चुकीचे ठरवणारे तुम्ही कोण. निलेश राणे यांनी संजय राऊतना समजेल अश्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. त्यामुळे संजय राऊत हेच या सर्व प्रकाराला कारणीभूत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा. अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!