शिवजन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य
आचरा (प्रतिनिधी) : शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे मित्रमंडळ यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा 19 फेब्रुवारी रोजी मोठया दिमाखात व उत्साहात सपन्न झाला. या विविधांगी कार्यक्रमा वेळी महेश राणे मित्रमंडळाकडून आचरा वासिय पत्रकार दै. प्रहारचे अर्जुन(दादा) बापार्डेकर, दै तरुण भारतचे परेश सावंत, दै. पुढारीचे उदय बापार्डेकर, आपला सिंधुदुर्ग डिजिटलचे विवेक(राजू)परब, दै लोकमतचे सिद्धेश आचरेकर यांचा तर कै. भाई खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्राप्त दै प्रहार मसुरे प्रतिनिधी झुंझार पेडणेकर यांचा शाल, श्रीफळ, पुप्षगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष महेश राणे, विभागीय अध्यक्ष चंद्रकांत गोलतकर, उपविभागीय अध्यक्ष अश्विन हळदणकर, आचरा सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर, अजित साटम, अमर पळसबकर, ग्रामपंचायत सदस्य मयु घाडी, चंदू कदम, आदी उपस्थित होते.













