किरकोळ वादा नंतर तुफान राडा
दोन्ही कडील तो युवक जखमी !
फोंडाघाट प्रतिनिधी : कोल्हापूर येथील तरुण गाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असताना, घाट पायथ्याशी एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबले. त्यावेळी किरकोळ वादातून प्रसंग, हाणामारीवर पोचला.यामध्ये कोल्हापूर मधील तरुणांनी स्थानिक तरुणांना मार दिल्यानंतर,स्थानिक लोकांनी एकत्र जमून त्यांनाही चोप दिला. याचे पर्यावसन मारामारी मध्ये झाले.दोन्ही बाजूचे तरुण एकमेकांना भिडले. या दरम्यान कोल्हापूर येथील तरुणांची गाडी स्थानिकांकडून फोडण्यात आल्याचेही समजते.या घटनेनंतर दोन्ही बाजूच्या जखमींना उपजिल्हा रुग्णालयात कणकवली येथे नेण्यात आले.या घटनेनंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र राजकीय हस्तक्षेपानंतर दोन्ही बाजूने प्रकरण मिटविण्यात आले असे समजते.. स्थानिक आणि पर्यटक यांच्या या बेधडक वृत्तीमुळे पेठेमध्ये चिंता व्यक्त होत आहे..












