22 व 23 फेब्रुवारी रोजी माधवबागच्या कणकवली, कुडाळ, सावंतवाडी केंद्रांवर होणार तपासणी
कणकवली (प्रतिनिधी) : अँजिओप्लास्टी आणि बायपास खरंच टाळता येते? या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास ‘होय’ असे आहे. कारण ब्लॉकेजस्, मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, हृदय रोगींसाठी माधवबागच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध होत आहे. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये हृदयाची खालावलेली स्थिती सुधारू शकते का? हृदयाची शस्त्रक्रिया टळू शकते का? हृदयरोगा बरोबर मधुमेह, उच्चदाब नियंत्रणात राहू शकतो का? शस्त्रक्रियेवरील मोठा खर्च टाळता येऊ शकतो का? या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. दिनांक 22 व 23 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 10 ते 06 वाजेपर्यंत हे तपासणी शिबिर माधवबागच्या कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. या शिबिरात हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी, ई.सी.जी. TMT टेस्ट (हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी) याशिवाय तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व मोफत सल्ला दिला जाणार आहे. या संधीचा लाभ संबंधित रुग्णांनी प्राप्त करावा आणि आपले आरोग्य सुरळीत राखावे, असे आवाहन माधवबागच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क कणकवली 9373183888, कुडाळ 901132858, सावंतवाडी 7774028185.