श्री स्वामी समर्थ मठ-मिठमुंबरी येथे पहिला वर्धापन दिन सोहळा होतोय संपन्न

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

देवगड (प्रतिनिधी) : मिठमुंबरी येथे श्री स्वामी समर्थ मठाचा पहिला दिन सोहळा संपन्न होत आहे. बुधवार दि. २५ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२४ पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आरती, महाप्रसाद असा गरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ मठाच्या पहिल्या वर्धापन दिनास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेट देत स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी मठाचे मठादीपती आत्माराम गांवकर यांनी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा उथोचित सत्कार केला. यावेळी युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गांवकर व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!