तरंदळे येथे शिवजयंतीनिमित्त ग्रामपंचायत आयोजित आणि भाजपा पुरस्कृत विविध स्पर्धा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393व्या जयंती निमित्त तरंदळे ग्रामपंचायत आयोजित भारतीय जनता पार्टी पुरस्कृत विविध प्रकारच्या स्पर्धा १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आल्या. रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता शाळा तरंदळे नंबर 1 पासून ग्रामपंचायतपर्यंत रॅली काढण्यात काढण्यात आली. त्यानंतर महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त वेशभूषा व संवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुढील प्रमाणे स्पर्धकांनी यश संपादन केले;

अंगणवाडी वेशभूषा स्पर्धा
1.नितेश खरात, 2.स्वरा मुणगेकर, 3.रेणुका जाधव, 4.गिरिजा सावंत

अंगणवाडी रंगभरण स्पर्धा

  1. तक्षिल कदम, 2. वेद गावकर. 3.यश सावंत, 4.वेदांत गावकर

रंगभरण स्पर्धा लहान गट
1.शमिका गजानन परब, 2.विश्वजीत बाळकृष्ण खरात., 3.हर्ष नरेश घाडी गावकर, 4. प्रीशा प्रकाश खोत

मोठा गट
1.दिशा दिनेश घाडी गावकर, 2 प्रतीक्षा प्रकाश कदम, 3.तन्मय रामचंद्र घाडी गावकर, 4.लव उमेश खांदारे

निबंध स्पर्धा लहान गट
1.विश्वजित बाळकृष्ण खरात, 2. आर्या राजेंद्र घाडी गावकर, 3. गौरवी केशव परब, 4.वेदांत जगदीश सावंत

मोठा गट
1.प्रतीक्षा प्रकाश कदम, 2.समीक्षा संतोष कदम, 3.निशा अनिल राणे, 4.दिशा दिनेश घाडीगावकर

वेशभूषा स्पर्धा स्पर्धा लहान गट
1.मानवी रामदास सामंत., 2.विश्वजित बाळकृष्ण खरात, 3. प्रणित रामदास सावंत, 4.सोनिया विकास सावंत

मोठा गट

  1. निशा अनिल राणे, 2. दिशा दिनेश गावकर, 3.तेजस्विनी रमाकांत देवलकर, 4.समीक्षा संतोष कदम

वक्तृत्व स्पर्धा लहान गट

  1. गौरवी केशव परब, 2.आरोही राजू जंगले, 3.सोनिया विकास सावंत, 4.सर्वेश संतोष खरात

मोठा गट
1.तेजस्विनी रमाकांत देवलकर, 2.निशा अनिल राणे, 3.दिशा दिनेश गावकर, 4.प्रतीक्षा प्रकाश कदम

मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम पार पाडण्यात आला. ह्यावेळी सरपंच सुशिल कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले, की जी माणसे इतिहास विसरतात ती माणसे इतिहास करू शकत नाही. आपल्याला इतिहासात नाव अजरामर करायचं असेल तर महाराजांचा इतिहास, पराक्रम आठवावा लागेल. महाराजांचा अभ्यास करावा लागेल. वाचेल तो वाचेल. वाचल्याशिवाय पर्याय नाही. मुलांच्या नेतृत्वाला, त्यांच्या कलेला, विद्यार्थी कसा घडेल ह्यासाठी ही स्पर्धा राबविण्यात आली. ह्यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले. परीक्षक म्हणून श्री.पोकळे, श्री.डोईफोडे, श्री.तांबे, श्री.तळदेवकर, तांबे मॅडम, तळदेवकर मॅडम यांनी काम पाहिले. यावेळी गावचे सरपंच सुशिल कदम, उपसरपंच शुभावली सावंत, माजी सरपंच सुधीर सावंत, माजी उपसरपंच संदेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुनिल दत्त जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य देवा रावले, नेहा घाडीगावकर आणि माता पालक संघ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!