ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्काॕम संलग्न) आचरे पंचक्रोशी कडून आचरा पोलीस स्टेशनला निवेदन
आचरा (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिक सेवा संघ(फेस्काॕम संलग्न)आचरे पंचक्रोशी कार्यकारी मंडळाने आचरे पोलीस स्टेशनला भेट देऊन आचरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक खंडागळे यांना आचरे पंचक्रोशीत सर्व ज्येष्ठ नागरिक असुरक्षिततेच्या वातावरणात वावरत असून आचरे पंचक्रोशीतील जनता, एक एकटे रहाणारे ज्येष्ठ नागरिक यांना सुरक्षा देण्यासाठी काय उपाययोजना केली याचा जाब विचारला. गेले वर्षभर घरफोड्या, जबरी चोऱ्या, लूटमार यामुळे पंचक्रोशीत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. धारगळकर सोनारांपासून दामोदर साळकर ज्येष्ठ नागरिकां पर्यंत झालेल्या गुन्हा आणि गुन्हेगाराचा शोध का लागत नाही? उपाययोजना काय केल्या? हा जाब विचारला. संस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह जकारीन फर्नान्डीस, बाबाजी भिसळे, सुरेश ठाकूर, लक्ष्मण आचरेकर, रावजी कदम, प्रकाश पुजारे, महिला प्रमुख मनाली फाटक आदी कार्यकारीमंडळ सदस्य उपस्थितीत होते. खंडागळे यानी ३१.१२. २०२४ रोजी ज्येष्ठ नागरिक सेवासंघ सभेत आधिकारीवर्गा सोबत उपस्थितीत राहून याबाबत उपाय योजनांची माहीती देतो. असे आश्वासन दिले.