कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सुप्रसिद्ध बेलवलकर ज्वेलर्स शो रूम चे मालक तथा प्रतिथयश बांधकाम, हॉटेल व्यावसायिक रोटरीयन दीपक बेलवलकर यांचे चिरंजीव आर्किटेक्चर मंदार उर्फ सोमेश यांचा शुभविवाह रत्नागिरी येथील नितीन वसंत कारेकर यांची सुकन्या आर्किटेक्चर क्षितिजा हिच्याशी ओरोस येथील शरद कृषी भवन येथे मोठ्या थाटामाटात 24 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. विवाहप्रसंगी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडें, कोकण सिंचन महामंडळाचे माजी अध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेता संजय कामतेकर, विरोधी गटनेता सुशांत नाईक यांच्यासह मान्यवरांनी वधूवराला शुभाशीर्वाद दिले. जिल्ह्यातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी समाजातील शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.