कणकवली (प्रतिनिधी) : वारगाव माजी सरपंच एकनाथ कोकाटे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खारेपाटण विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते कोकाटे यांना शिवसंवाद मेळाव्यात नियुक्तीपत्र देण्यात आले. भाजपातून उ.बा.ठा.शिवसेनेत दाखल झालेल्या एकनाथ कोकाटे यांच्यावर खारेपाटण विभागाची जबाबदारी सोपवत खारेपाटण विभागात शिवसेना वाढीची जबहादरी सोपविण्यात आली आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षसचिव खासदार विनायक राऊत शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार कोकाटे यांची नियुक्ती करत असल्याचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी नियुक्तिपत्रात नमूद केले आहे.













