कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यातील हुमरठ येथे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ बैठक घेतली. लोकानी राणे साहेब यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा शब्द दिला त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर,कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, हुमरठ माजी उपसरपंच मुश्ताक काझी, सईद काझी, वासिम शेमना व ग्रामस्थ उपस्थित होते.















