शिरवलवासीयांची राजकीय प्रचार बंदी ! आधी रस्ता करा नंतर प्रचार करा

शिरवल गावच्या प्रवेशद्वारावर प्रचारासाठी प्रवेश बंदीचा लावण्यात आला फलक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेला शिरवल गावातील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. ३० वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला हा रस्ता आता मात्र शेवटच्या घटका मोजत आहे. रस्त्याचे काम सुरू होईल या भाबड्या आशेवर मात्र शिरवल ग्रामस्थ प्रतीक्षेत आहेत. रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर असुन निविदा काढण्यात आली आहे.कार्यारंभ आदेश मिळून सुद्धा एप्रिल महिना संपत आला तरी शिरवल गावच्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होत नसल्याने शिरवल ग्रामस्थांनी बॅनरच्या माध्यमातून सर्व पक्षीयांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

जोपर्यंत शिरवल मध्ये जाण्यासाठी रस्ता डांबरीकरण करुन मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी बॅनरच्या माध्यमातून केली आहे.

शिरवल ग्रामस्थांनी सर्वपक्षीयांना थेट गावात प्रचारास प्रवेश बंदी केली आहे.मागील ३० वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला हा रस्ता‌ आता मात्र शेवटच्या घटका मोजत आहे. रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

ग्रामस्थांनी सर्वपक्षीय नेते,मंत्री, आमदार, खासदार यांना भेटून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या‌ कामाला सुरुवात करुन रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत करुन द्या. अशी विनंती वजा मागणी केली.आणि साकडे घातले. मात्र, लवकरच डांबरीकरणाचे काम सुरु होईल असे आश्वासनाचे गाजर मागील महिन्यापासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते मंडळी, आमदार, खासदार देत आहेत.निवडणुकीपुरती खोटी आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्या पलीकडे राजकीय पुढाऱ्यांनी काहीही केले नाही. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शिरवल मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात केली नाही तर लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला जाईल.अशी ग्रामस्थांमधून चर्चा जोर धरत आहे.

शिरवल मध्ये प्रचारासाठी येण्यास प्रवेश बंदी असा फलक देखील शिरवल गावच्या प्रवेशद्वारावर आणि शिरवल फणस बस स्टॉपवर लावण्यात आला आहे.हा फलक लक्षवेधी ठरत आहे.

जोपर्यंत शिरवल मध्ये जाण्यासाठी रस्ता डांबरीकरण करुन मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी येऊ नये.अशा आशयाचे हे बॅनर मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत असून शिरवल रस्त्याच्या डांबरीकरणाची चर्चा मात्र यानिमित्ताने जोर धरत आहे.

या निमित्ताने मात्र राजकीय नेते, आमदार, खासदार यांना नक्कीच लक्ष द्यावे लागेल.हे मात्र नक्की.अशी चर्चा मात्र जोरात सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!