खा.विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी घेतला आढावा

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार तोफ 3 मे रोजी कणकवलीत धडाडणार असून लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी कणकवली सभास्थळी आढावा घेतला. यावेळी शिवसेना उपनेते तथा सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना सिंधुदुर्ग नेते अतुल रावराणे, गीतेश राऊत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कन्हैया पारकर, सचिन आचरेकर, राजू राठोड, सी आर चव्हाण आदी उपस्थित होते. कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांची विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आहे. हिसभा निर्णायक होणार असून ही सभा निर्णायक होईल.ही महाविकास आघाडीची विजयी सभा ठरणार असल्याचेही राऊत म्हणाले.

error: Content is protected !!