राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

कुडाळ (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कुडाळ हायस्कुल येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रीय काँग्रेस, आप या महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे पुन्हा एकदा विजयी होऊन विजयाची हॅट्ट्रिक साधतील. देशातील अराजकता संपवण्यासाठी जनतेत भाजपा विरोधी लाट आहे. भाजपच्या राजवटीत संविधान आणि लोकशाही धोक्यात असून हुकुमशाही सुरू आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील विरोधी उमेदवार नारायण राणे यांची राडेबाजी आणि त्यांच्या मुलांच्या राणे भाजपाच्या दमबाजी ला मूळ भाजपा चे पदाधिकारी कंटाळले आहेत. त्यामुळे देशातील अराजकता संपवण्यासाठी कोकणी मतदार महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत याना मशाल निशनिसमोरील बटन दाबून विजयी करतील असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!