बंदर आणि पर्यटन विभाग यांनी जिल्ह्यात उद्यापासून जल पर्यटन बंदीचे दिले आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्यापासून जल पर्यटन बंद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व प्रकारचे जल पर्यटन 26 मे ते 31 ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश बंदर आणि पर्यटन विभागाने जारी केले आहेत त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी 26 मे पासून सागरी जल पर्यटन आणि सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंतीसाठी मालवण गाठणाऱ्या पर्यटकांचा या बंदीमुळे हिरमोड होण्याची शक्यता आहे. परंतु पर्यटकांची संभाव्य नाराजी टाळण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फर असोसिएशन विभागाकडे काही दिवसाची मुदतवाढ मागितली आहे मे महिन्यातील पर्यटन हंगाम 15 मे नंतर मोठ्या प्रमाणात सुरू होतो तरी मासेमारी हंगामाप्रमाणे आपणास 31 मे पर्यंत हंगाम परवानगी द्यावी.या अगोदर हवामानाचा अंदाज घेऊन बंदर विभागाने काही दिवसांसाठी टप्प्याटप्प्याने मुदतवाढ दिलेली होती असे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फर असोसिएशनचे म्हणणे आहे 2016 मधील मुदतवाड आदेशाची प्रत सुद्धा संघटनेने आपल्या निवेदनासोबत बंदर विभागाला सादर केली आहे आत्ता शासनाकडून या मागणीला प्रतिसाद मिळतो का याकडे पर्यटन व्यवसायिकांचे लक्ष लागून आहे. गतवर्षी पावसाळी हंगामामुळे पर्यटकांच्या सुरक्षितेच्या कारणास्तव 26 मे ते 31 ऑगस्ट या कालावधीत पर्यटन जल पर्यटन बंद करण्यात आले आहे. आता यावर्षी सुद्धा बंदर विभागाने पर्यटन विभाग आणि पर्यायाने शासन आपल्या भूमिकेव ठाम राहते की जल पर्यटन व्यवसायिकांना टप्प्याटप्प्याने काही दिवसांसाठी मुदतवाढ देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.पर्यटकांना बसला मंदीचा फटका गतवर्षी 26 मे पासून हजारो पर्यटकांना जेट्टीवरून किल्ला दर्शन करावे लागत होते मालवणात आलेले पर्यटक रॉक गार्डन आणि तालुक्यातील समुद्रकिनारी फिरून माघारी परतत होते 31 मे पर्यंत मोठ्या संख्येने पर्यटक मालवणात येत होते मात्र 26 मे पासून जल पर्यटन बंदीचा फटका त्यांना बसला होता जल पर्यटनासाठी मुदत वाढीची मागणी करण्यात आली आहे मात्र सागरी जल पर्यटना बरोबर समुद्रात मालवाहतूक करणारी जहाजे तसेच नद्या किंवा तलावातील पर्यटनाला सुद्धा ही बंदी लागू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!