सिंधुदुर्ग जिल्हयातील वानर व माकडे यांची प्रगणना पुर्वतयारी कार्यशाळा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील खाजगी व वनक्षेत्रातील वानर व माकड यांची प्रगणना होणार आहे. त्याची पुर्वतयारी म्हणुन दि. 24/05/2024 रोजी सावंतवाडी नगरपालिकेतील बॅ.नाथ पै सभागृहात एक दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली. एच.एन कुमार प्रमुख शास्त्रज्ञ संवर्धन जीवशास्त्र SACON कोईम्बतुर यांनी संपुर्ण प्रशिक्षण यांची माहिति PPT व क्षेत्रीय भेटीवेळी दिली.

संपुर्ण जिल्हयातील प्रादेशिक व सामाजिक वनीकरण वनविभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मा.उपवनसंरक्षक रेड्डी यांनी प्रस्तावना केली. सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास सहा. वनसंरक्षक डॉ.सुनिल लाड, यांनी प्रमुख शास्त्रज्ञ एच.एन कुमार यांची ओळख करुन दिली. एच.एन कुमार यांनी संपुर्ण प्रशिक्षणाची माहिती PPT द्वारे दिलेली होती सदरची माहिती क्षिरसागर वनक्षेत्रपाल सावंतवाडी यांनी मराठीमध्ये भाषांतर करुन प्रशिक्षणार्थाना सांगण्यात आली त्यामुळे प्रशिक्षणार्थाना माहिती आत्मसात करणे सोयीचे झालेले आहे. सदरच्या कार्यक्रमास मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांची उपस्थिती होती.

सदर प्रशिक्षणात संदिप कुंभार वनक्षेत्रपाल कुडाळ, अमित कटके वनक्षेत्रपाल कडावल, विदया घोडके वनक्षेत्रपाल आंबोली, वैशाली मंडल वनक्षेत्रपाल दोडामार्ग तसेच सर्व वनपाल, वनरक्षक, वनमजूर उपस्थित होते. नरेंद्र डोंगर येथे प्रात्यक्षिक करुन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आटोपुन संदिप कुंभार वनक्षेत्रपाल कुडाळ यांनी आभारप्रदर्शन करुन कार्यक्रमाचा समारोप करणेत आला. तसेच दिनांक 25/05/2024 पासुन सिंधुदुर्ग जिल्हयातील खाजगी व वनक्षेत्रातील वानर व माकड यांची प्रगणना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!