वरवडे येथील सावली जनसेवा शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप

वैभववाडी (प्रतिनिधी) : सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे कणकवली यांच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील गरीब, गरजू तीन विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजू पवार, वैभववाडी व्यापारी संघटना अध्यक्ष रत्नाकर कदम, जयवंत पळसुले, रमेश गुरव तसेच सावली जनसेवा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रसाद देसाई, सचिव सदा चव्हाण, सदस्य संतोष पुजारी, जयप्रकाश पारकर आदी उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने वैभववाडी तालुक्यात दहा सायकली देण्यात येणार आहेत. त्यापैकी तीन सायकलचे वितरण आज पार पडले. विद्यार्थिनी ऋणाली गंगाराम जाधव करूळ, तृप्ती राजेंद्र सावंत नावळे, लाजरी प्रकाश शेणवी नाधवडे यांना सायकल देण्यात आल्या. जनसेवा संस्था सामाजिक बांधिलकी जोपासत विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत आहेत. यापूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना रेनकोट, वह्या व स्कूल बॅग चे वाटप केले होते. महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. सायकल वितरण वेळी विद्यार्थी व पालकांनी संस्थेचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!