संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या “कलमठ प्रीमियर लीग ” क्रिकेट स्पर्धेचा थरार 8 मार्च पासून

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेली संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित क्रेझी बॉईज क्रिकेट स्पर्धा 8 मार्च पासून सुरू होत आहे. 8 मार्च ते 12 मार्च दरम्यान खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेत कलमठ पंचक्रोशीतील खेळाडूंना आपल्या खेळाचे कौशल्य दाखविण्यासाठी कलमठ प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धे दरम्यान आमदार नितेश राणें,जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बैंक अध्यक्ष मनीष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गोटया सावंत,नगराध्यक्ष समीर नलावड़े, मिलींद मेस्त्री, संतोष कानडे उपस्थित राहणार आहेत.

कलमठ प्रीमियर लीग साठी प्रथम पारितोषिक 30 हजार व आकर्षक चषक व द्वितीय पारितोषिक 20 हजार व आकर्षक चषक व वैयक्तिक पारितोषिकात सर्वोत्कृष्ट खेळाडू, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, अंतिम सामना सामनावीर तसेच प्रत्येक सामन्यातील सामनाविरास आकर्षक चषक त्याचबरोबर सर्व सहभागी खेळाडूंना टी-शर्ट आणि ट्रॅक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत कलमठ वरवडे वागदे आशिया सातरल, कासरल, तरंदळे, पिसेकामते, जाणवली, बिडवाडी या गावातील खेळाडू सहभाग घेणार आहेत. मागील 20 वर्षे सातत्याने संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी सर्व क्रीडा रसिकांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट द्यावी असे आवाहन संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!