एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पदाच्या अधिकारांचा वापर करत का.अ. सर्वगौड यांचा निकम्म्या ठेकेदारांना दणका
कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे दर्जेदार व्हावीत व यातून शासनाचा निधी योग्य प्रकारे या कामांकरिता वापरला जावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे गुणवत्तापूर्ण होण्याची भूमिका घेण्यात आली आहे. कामांचा ठेका घेऊन ती कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांबाबत देखील कडक भूमिका घेण्यात आली असून, कणकवली विभागातील आतापर्यंत तीन ठेकेदारांच्या परवाना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आला आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड किंवा कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत. कारण हा शासनाचा पर्यायाने सर्वसामान्य जनतेचा पैसा या विकास कामांसाठी दिला जातो. व हा निधी योग्य जागी योग्य प्रकारे खर्च व्हावा ही शासनाची भूमिका असते. त्यामुळे याबाबत कडक धोरण अंमल अवलंबण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जी कामे गेली अनेक महिना अपूर्ण स्थितीत ठेवण्यात आली आहेत अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची कार्यवाही देखील सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निविदा काढत असताना यापुढे अपूर्ण कामे असलेल्या ठेकेदारांच्या निविदा ओपन करू नयेत अशी अट देखील यापुढे निविदेमध्ये घातली जाणार आहे. अशी माहिती श्री सर्वगोड यांनी दिली. सर्वगोड यांच्या या आक्रमक स्टाईल मुळे ठेकेदारी वर्तुळात मात्र काहींचे धाबे दणाणले आहेत.