जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या उर्वरित बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता व 23 कोटींचा निधी मंजूर करण्यात यावा

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभागाने 2013-14 मध्ये जिल्हा महिला व बाल रुग्णालय सिंधुदुर्ग कुडाळ रुग्णालयाचे बांधकाम करण्याकरिता 14 कोटी निधीला मान्यता दिली असून रुग्णालयाचे सर्व बांधकाम हे मूळ आराखड्यानुसार झाले नाही म्हणून बांधकाम विभागाने 23 कोटी रकमेचे टप्पा दोन बांधकामाचे अंदाजपत्रक शासनाने 2018-19 या वर्षात सादर केले होते. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सदर कामाला प्रशासकीय मान्यता व निधी प्राप्त झाला नसल्याने रुग्णालयाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या टप्पा दोन मधील बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.

जिल्हा महिला व बाल रुग्णालय सिंधुदुर्ग कुडाळ रुग्णालयाचे बांधकाम टप्पा दोनसाठी शासकीय मान्यता व निधी रुपये 23 कोटी या वर्षात मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्याकडे वर्ग करण्यात करिता सहकार्य करावे तसेच जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग हे जिल्हा महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे कार्यरत करण्यास करण्यास शासनाने मान्यता द्यावी. जेणेकरून कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील जनतेला आरोग्य सेवेसाठी मध्यवर्ती असलेल्या कुडाळ या ठिकाणी येता येईल. त्यामुळे जनतेच्या सोयीकरता या मागण्यांचा विचार करून योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!