मालवण येथील साळगावकर यांच्या वैद्यकीय उपचारासाठी १ लाख रुपये मंजूर

आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन अर्थसहाय्य

मालवण (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मालवण येथील साळगावकर यांच्या वैद्यकीय उपचारासाठी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून १ लाख रु अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. साळगावकर या मेंदूच्या आजारावर मुंबई येथील पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतुन आर्थिक सहाय्य व्हावे अशी मागणी साळगावकर कुटुंबीयांनी आ. वैभव नाईक यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल आ. वैभव नाईक यांनी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे शिफारस करून त्यांना एक लाखाचे अर्थसहाय्य मिळवून दिले आहे.

गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तीना होणाऱ्या आजारावरील खर्च भागवण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतून आर्थिक साहाय्य केले जाते. या निधीचा उपयोग कूडाळ – मालवण तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गरजुंना व्हावा या उद्देशाने आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे शिफारस करून आतापर्यंत अनेक गरजुंना आर्थिक सहाय्य्य मिळवून दिले आहे. साळगावकर यांना आर्थिक सहाय्य्य मिळवून दिल्याबद्दल कुटूंबियांच्या वतीने आ.वैभव नाईक यांचे आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!