प्रमाेद काळसेकर यांचा पाेलिस महासंचालकांकडून सन्माचिन्ह देऊन गाैरव ; उल्लेखनिय कामगिरीबद्दल केला सन्मान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : पोलीस सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस नाईक प्रमोद काळसेकर यांचा पोलीस महासंचालकांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. अनेक गुन्ह्यांच्या तपासात काळसेकर यांचा महत्वाचा वाटा होता. तसेच अपघतातील जखमींना त्यांनी अनेकवेळा जीवनदान दिल आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल पोलीस दलाने घेत त्यांचा गौरव केला. याबद्दल सर्वच स्तरातून काळसेकर यांच कौतुक होत आहे. पोलिसांवर बऱ्याचवेळा टीका होत असते. पण या खाकी वर्दीच्या मागे देखील माणूसपण दडलेलं असतं, हे आपण अनेक वेळा अनुभवलं. त्याचाच प्रत्यय दोन दुचाकीस्वारांना आला. झाराप पत्रादेवी मार्गावर अपघात झाला होता. या अपघातातील दोन्ही जखमी अत्यावस्थेत होते. ते दोन्ही जखमी बाहेरच्या गावाच्या होते. तेव्हाच काम संपवून जाणारे पोलीस नाईक प्रमोद काळसेकर यांच्या ते निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब नकरता जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. वेळीच मिळालेल्या मदतीमुळे आणि उपचारांमुळे त्या दोन्ही जखमींचे प्राण वाचले. अश्या अनेक वेळी काळसेकर यांच्यातल्या माणुसकीचे दर्शन घडले. पोलीस शिस्तबद्ध आणि कठोर असतो हे खर असलं तरी त्याच्यात एक भावनिक माणूसही वावर करत असतो. काळसेकर यांनी अश्या अनेक वेळा जिवाजी बाजी लढवून अनेकांचे प्राण वाचवले. त्याच बरोबर अनेक प्रलंबित गुन्ह्याचा छडा हि काळसेकर यांनी लावला. २१ फेब्रुवारी २००५ ला प्रमोद काळसेकर आपल्या पोलीस सेवेला दाखल झाले होते. पहिली उपचारांमुळे त्या दोन्ही जखमींचे प्राण वाचले. अश्या अनेक वेळी काळसेकर यांच्यातल्या माणुसकीचे दर्शन घडले. पोलीस शिस्तबद्ध आणि कठोर असतो हे खर असलं तरी त्याच्यात एक भावनिक माणूसही वावर करत असतो. काळसेकर यांनी अश्या अनेक वेळा जिवाजी बाजी लढवून अनेकांचे प्राण वाचवले. त्याच बरोबर अनेक प्रलंबित गुन्ह्याचा छडा हि काळसेकर यांनी लावला. २१ फेब्रुवारी २००५ ला प्रमोद काळसेकर आपल्या पोलीस सेवेला दाखल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!