वारकरी व शेतकरी वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले साऱ्यांचे लक्ष
वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने वृक्षारोपण व वृक्षदिंडी चे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : १ जुलै ते ७ जुलै सर्वत्र वनमहोत्सव साजरा करण्यात येतो या पार्श्वभूमीवर वैभववाडीत अर्जुन रावराणे आणि जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व हेमंत केशव रावराणे आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे हे जनतेत पोचवण्याच्या प्रमुख उद्देशाने वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या वृक्ष दिंडीमध्ये किलबिल जे बारावीपर्यंत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी वारकरी शेतकरी यांच्या वेशभूषेत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सकाळपासून सुरू असलेल्या संतधर पावसात देखील मोठ्या उत्साहाने “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” या अभंगाच्या ओळी म्हणत झाडे लावा झाडे जगवा..! अशा विविध वृक्ष संवर्धनाच्या घोषणा देत विद्यालयाच्या प्रांगणापासून संपूर्ण बाजारपेठेत विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली व सर्व जनसमुदायाला वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. वृक्ष संवर्धनाच्या घोषणांसह वैभववाडी बाजारपेठेत वृक्षदिंडी उत्साहात संपन्न झाली.
वैभववाडी तालुका सामाजिक वनीकरण विभाग यांच्यावतीने या वृक्षदिंडीसाठी पालखी व शालेय परिसरात तसेच विद्यार्थ्यांच्या घराशेजारील परिसरात वृक्ष लागवड व्हावी या हेतूने अनेक प्रकारची झाडे उपलब्ध करून देण्यात आली होती शिवाय सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडीचे अधिकारी व कर्मचारी देखील या दिंडीत सहभागी झाले होते वृक्षदिंडी मधील सजावलेली पालखी तसेच पारंपारिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व वारकरी वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. वैभववाडी तालुका वनक्षेत्रपाल एल.व्ही.पोतदार, वैभववाडी तहसीलदार सुर्यकांत पाटील यांनी वृक्षदिंडीचे पूजन करून व श्रीफळ वाढवून दिंडीची सुरुवात केली शालेय परिसरात सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, एन .सी.सी.चे सर्व विद्यार्थी, प्रशालेचे शिक्षक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी वैभववाडी गटविकास अधिकारी यांची अनुपस्थित चर्चेचा विषय ठरली.
याप्रसंगी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर, विजय रावराणे, मुख्याध्यापक बी.एस नादकर, वैभववाडी तहसीलदार सुर्यकांत पाटील, कृषी अधिकारी युवराज पाटील, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, वनक्षेत्रपाल एल व्ही पोतदार, वनपाल प्रकाश पाटील ,वनरक्षक विद्या जाधव वनमजूर तात्या ढवण सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी. तसेच प्रशालेचे पर्यवेक्षक एस.बी.शिंदे, सांस्कृतिक प्रमुख विजय मरळकर पंडित पवार, माध्यमिक विभाग प्रमुख सौ .एस.एस.पाटील, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख पी.जे.सावंत, प्रशालेचे आर.एस.पी.अधिकारी एम.एस.चोरगे, एन.सी.सी अधिकारी एस.टी.तुळसणकर प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.