दातृत्वाची भावना अंगी बानवा : अविनाश मांजरेकर
तळेरे (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीमध्ये दातृत्वाला अत्यंत महत्त्व आहे. दानी संस्कृती म्हणून आपली जगभरात ओळख आहे ,म्हणून जे पेराल तेच उगवेल या उक्तीप्रमाणे दातृत्वाची भावना अंगी बानवा.तुमच्या मदतीलाही असंख्य हात उभे राहतील,असे प्रतिपादन प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले.वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयातील नवोदित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी शाळा स. सदस्य उमेश कदम,माजी विद्यार्थी व उद्योगपती तेजस जमदाडे,अनिरुद्ध महाडिक ,मिथील डंबे,सहा. शिक्षिका डी.सी.तळेकर,एस.यु. सुर्वे,निकिता तर्फे तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई कडुन प्रशालेतील नवोदित विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश,दप्तर,वह्या व छत्री दिले जातात.यावर्षीही प्रशालेत या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल अशी दातृत्वाची भावना बाळगणारी प्रशाला आणि मी या प्रशालेमध्ये शिकलो याचा मला सार्थ अभिमान आहे,असे प्रतिपादन माजी विद्यार्थी तेजस जमदाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.उपस्थित सर्वांनी प्रशालेच्या या दातृत्वाबद्दल प्रशालेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहा.शिक्षिका एस.यु.सुर्वे यांनी केले.