कळणे विद्यालयात अंमली पदार्थविरोधी जनजागृती

पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी केले मार्गदर्शन

दोडामार्ग (प्रतिनिधी) : नूतन विद्यालय, कळणे येथे अंमली पदार्थ विरोधी सप्ताह निमित्त अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम व नवीन कायद्यांची ओळख याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. सदर कार्यशाळेमध्ये 10 शिक्षक व 80 विद्यार्थी असे उपस्थित होते.

सदर कार्यशाळेमध्ये अमली पदार्थांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, तसेच अमली पदार्थ सेवन व छुप्या पद्धतीने होणारी तस्करी यावरील कायद्यामध्ये असलेली तरतूद व शिक्षा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच ट्रॅफिक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले, त्याचप्रमाणे एक जुलै 2024 रोजी पासून भारतीय कायद्यामध्ये झालेला बदल याचे मार्गदर्शन व माहिती उपस्थित प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!