दोडामार्ग (प्रतिनिधी) : कोकणातील गणेशोत्सव हा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या सणासाठी आजूबाजूच्या खेडेगावातील अनेक लोक साटेली-भेडशी येथील बाजारामध्ये खरेदीसाठी येत असतात, अशावेळी बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. आणखी अनेक बेशिस्त वाहन चालक हे त्यांच्या ताब्यातील वाहन सार्वजनिक रस्त्यावर लावून वाहतुकीस अडथळा तयार करतात त्यामुळे साटेली-भेडशी रोडवर नेहमीच वाहतुकीची कोंडी झालेली दिसून येते. याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला नेहमीच होत असतो. याबाबत पोलीसांनी वेळोवेळी अशा वाहन धारकांना सूचना देऊन देखील ते त्यांच्या ताब्यातील वाहन हे रस्त्यावर लावून वाहतुकीस अडथळा केलेचे नेहमीच दिसून येत असतात, त्यामुळे अशा लोकांना शिस्त लावण्यासाठी दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, ASI गवस/4, पो.हवा. देसाई/711, पो.शी विजय जाधव/1283 यांनी सदरसटेली बेडशी खालचा बाजार, वरचा बाजार व शिरांगे रोडवर बेशिस्तपणे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पार्किंग केलेल्या सुमारे 52 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे वाहतूक कोंडीने ग्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांकडून दोडामार्ग पोलीस यांचे कौतुकच केले जात आहे.