दोडामार्ग (प्रतिनिधी) : आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी कीर्ती विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगेवाडी आणि ग्रामपंचायत घोटगेवाडी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात प्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. प्रशालेच्या मुलांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत सादर केले. या कार्यक्रमाच्या आकर्षणासाठी उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे, तालुका कुडाळ येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम 2024-25 अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटगेवाडी येथे भारताचा एक लक्ष वेधून घेणारा नकाशा बनवला. या विद्यार्थ्यांनी Landscaping विषयामध्ये शिक्षण घेऊन लॉन ह्या गवती प्रकाराचा वापर करत भारताचा नकाशा बनवून घोटगेवाडी गावचे सरपंच मा. श्रीनिवास शेतकर व प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री. दत्ताराम दळवी यांच्या हस्ते कलाकृतीचे उद्घाटन केले. तसेच या कार्यक्रमानिमित्त प्राथमिक शाळा, घोटगेवाडी येथे लहान मुलांचा वेशभुषा कार्यक्रम घेण्यात आला. मुलांनी भारतीय संस्कृतीचा वारसा जपत विविध पुढारी, नेते यांची वेशभुषा साकारली. या कार्यक्रमाचे बक्षिस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.