दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील आडाळी खोसमवाडी येथील काजूबागेत काजूच्या झाडाला गळफास लावून घेत वृद्धाने आत्महत्या केली. सुरेश अर्जुन सावंत ( वय 70, मूळ रा. आडाळी, खोसमवाडी, सध्या रा. सावर्डे, गोवा ) असे मयत इसमाचे नाव आहे. मयत सुरेश याचा मृतदेह काजूच्या झाडाला नायलॉन च्या दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत 15 जून रोजी सकाळी 7 वाजता आढळून आला. याबाबत रवींद्र शंकर सावंत ( रा.खोसमवाडी, आडाळी ) यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून दोडामार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.