दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी उपस्थित उद्यानविद्या महाविद्यालय , मुळदे चे कृषी सहाय्यक अधिकारी हर्षद नाईक सर, दोडामार्ग तालुक्याचे कृषी पर्यवेक्षक प्रसाद खडपकर सर व घोटगेवाडी गावचे सरपंच श्रीनिवास शेटकर यांच्या हस्ते कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे उद्घाटन झाले.
या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत जास्तीत जास्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून विविध कृषीविषयक प्रश्नांचे निरासन करण्यात येणार आहे. पिक लागवडीपासून ते पिक काढणीपर्यंतचे मार्गदर्शन, दापोली विद्यापिठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या जाती, विविध पिकांवरील किड – रोग आणि त्यांचे नियंत्रण, पिकांच्या अचुक उत्पादन पद्धती, सुधारित कृषी अवजारे व साधणे आणि कृषी प्रकिया अभियांत्रिकी व तंत्रज्ञान याबद्दलची सखोल माहिती शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रामार्फत मिळणार आहे.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना कृषी सहाय्यक सयाजी शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या वेगवेगळ्या शासकिय योजना यांबद्दलची माहिती व पिक विमा चे महत्व शेतकऱ्यांना सांगितले. हा कार्यक्रम कृषी सहाय्यक हर्षद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कोनाळ गावचे उपसरपंच रत्नकांत करपे, जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा घोटगेवाडीचे मुख्याध्यापक दत्ताराम दळवी सर, पटगावकर सर, बाळकृष्ण मणेरीकर, वैभव पांगम , बबली दळवी, रामचंद्र देसाई, लक्ष्मण दळवी, रुक्मिणी नाईक, प्रिती भंडगे व इतर शेतकरी उपस्थित होते.