आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी ली चिंदरचे सेल्समन, चिंदर ग्रामपंचायत माजी सदस्य विलास उर्फ बाबा हडपी यांचे आज सकाळी रहात्या घरी दुःखद निधन झाले. ते 68 वर्षाचे होते. काही दिवसापासून ते आजारी होते. श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चिंदर येथील रेशन दुकानात त्यांनी सेल्समन म्हणून 25 वर्षाहून अधिक काळ सेवा केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, भाऊ, भावजया, पुतण्या, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी मंडळाचे भजनी बुवा म्हणून त्यांनी अनेक वर्षे सेवा केली होती. सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना उबाठा कार्यकर्ते संजय हडपी यांचे ते बंधू होत.