स्टॉल हटाव विरोधात महिलेचा आत्मदाहनाचा प्रयत्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या स्टॉल हटाव कारवाई विरोधात न प च्या कर्मचाऱ्यांसमोर स्टॉल धारक महिलेने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. स्टॉल हटाव मोहिमेच्या विरोधात महिलेने टोकाचे पाऊल उचलले.सदर घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्यासमोर स्टॉल धारक महिलेने आपली कैफियत मांडली अखेर पोलिसांच्या सहकार्याने स्टॉल धारक महिलेची समजूत काढत त्यांचे सांत्वन केले व सदर घटनेवर तात्पुरता पडदा पडला. वैभववाडी बाजारपेठेत गेली 40 वर्षापासून स्टॉलमध्ये शिवणकाम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाह करताना स्टॉल हटावमुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली तरी शासनाने व्यावसायिका करिता स्टॉल लावण्याची परवानगी द्यावी अशी मागणी स्टॉल धारक अंजली एकनाथ शिवगण यांनी वैभववाडी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तरी अद्याप नगरपंचायत प्रशासनाने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्याने गेल्या काही दिवसापासून त्यांनी पुन्हा नगरपंचायत जवळील फुटपाथ वर विना स्टॉल उघड्यावर शिलाई मशीन ठेवून त्या आपला व्यवसाय करत होत्या पावसामुळे उघड्यावर शिलाई काम करणे अशक्य असल्याने त्याने आपला स्टॉल पुन्हा फुटपाथवर मांडून व्यवसाय करण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी नगरपंचायत प्रशासन कारवाई करण्यासाठी कर्मचारी स्टॉलच्या समोर दाखल झाल्यानंतर स्टॉल धारक महिलेनी अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना वैभववाडी पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन स्टॉल धारक महिलेची समजूत काढत तात्पुरता या घटनेवर पडदा पडला.

error: Content is protected !!