सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म विभागाची ११३% महसूल वसुली

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्हयातील गौण खनिज व प्रमुख खनिज उत्खननामधून २०२३-२४ या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयाला तब्बल ८२ कोटी २५ लाख एवढा मोठा महसूल मिळाला आहे. खनिकर्म विभागाला शासनाकडून देण्यात आलेल्या महसुल उद्दीष्टापेक्षाही अधिकचा महसूल गोळा करून १०० टक्केपेक्षाही अधिक महसूल गोळा करून उद्दिष्ट पार करण्यात खनिकर्म विभागाला यश आले आहे. सिंधुदुर्गात वाळू, दगड, मुरुम या गौण खनिजांचे उत्खनन केले जाते. तर मॅग्नेज, लोह, तांबा, बॉक्साईट, क्रोमाईट यासारखी प्रमुख खनिजे उत्खनन केली जातात. यामधून मागील वर्षी मोठा महसूल जिल्हयाला मिळालेला आहे. गेल्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रमुख खनिजे उत्खननास विरोध सुरू होता. तसेच. गौण खनिज उत्खननामध्येही वाळूपट्टे किंवा दगड मुरुम या खाणींचेही लिलाव वेळीच होत नव्हते किंवा वेगवेगळ्या अटी- शर्ती घातल्या गेल्यामुळे खनिज उत्खनन होत नव्हते. मात्र, लिलाव झाले नसले तरी बेकायदेशीर खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत महसूल यंत्रणेने अनेकदा कारवाई केली होती. बेकायदेशीर वाळू उत्खनन करण्यासाठी खाडी किनारी बांधण्यात आलेले रॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले. तर काही ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. मालवण तालुक्यात अनेकदा वाळूने भरलेले डंपर पकडून कारवाई केली होती.

जिल्हयात काही ठिकाणी खनिजपट्टेही जाहीर करण्यात आले. मात्र, निसर्गसंपन्न सिंधुदुर्गला बाधा पोहोचू शकते. तसेच अनेकांच्या जमिनी, घरे जाऊ शकतात. त्यामुळे खनिज पट्ट्यांना काही ठिकाणी विरोध करण्यात आला. असे असले तरी रेडी, कळणे सारख्या मायनिंग पट्ट्यातून खनिज उत्खनन करण्यात आले. या खनिजाची परदेशात निर्यात करण्यात आली. त्यामुळे या प्रमुख खनिजामधून जिल्ह्याला महसूल मिळविता आले.

सन २०२३-२४ या वर्षात मार्चअखेरपर्यंत तब्बल ८२ कोटी २५ लाखाचा महसूल प्रमुख खनिजे व गौण खनिजांच्या माध्यमातून मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला गौण खनिजमधून महसूल मिळविण्यासाठी ५३ कोटी ५० लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, जिल्ह्याने ५५ कोटी ६६ लाख ७११ रुपये एवढा महसूल गोळा करून महसुली उद्दिष्टाच्या १०४.०३ टक्के एवढी उद्दिष्टपूर्ती केली आहे. प्रमुख खनिजमधून महसूल मिळविण्यासाठी शासनाने २३ कोटी ३७ होते. लाखाचे उद्दिष्ट दिले होते.

मात्र, सिंधुदुर्गन २६ कोटी ५९ लाख १७ हजार ६०३ रुपये महसूल गोळा करत महसुली उद्दिष्टांच्या ११३.७८ टक्के उद्दिष्टपूर्ती खनिकर्म विभागाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!