विजेचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यू

मालवण (प्रतिनिधी) : घरातील लाईट दुरूस्त करत असताना बसलेल्या विजेच्या धक्क्यात नंदकुमार विनायक पाताडे (५३, रा. प्रतापनगर जोगेश्वर-मुंबई) यांचे निधन झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मसुरे चुनवरे-पालकरवाडी येथील प्रमोद सावंत यांच्या घरी पाताडे आले होते. सावंत यांच्या घरातील लाईट गेल्यामुळे पाताडे हे लाईट दुरूस्तीसाठी गेले असताना त्यांना विजेचा जबरदस्त शॉक लागला. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पाताडे हे चिंदर पाताडेवाडी येथील मूळ रहिवासी आहेत.

error: Content is protected !!