वैभववाडी (प्रतिनिधी) : विशाल गडावर व गजापूर शाहुवाडी जि. कोल्हापूर येथे विघ्नसंतोषी जमावाने घरांची, दर्ग्याची, मशिदीची तोडफोड केली आहे. या घटनेचा वैभववाडी तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करीत, हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी. अशी मागणी केली आहे. तसे निवेदन तहसीलदार सूर्यकांत पाटील यांच्याकडे दिले आहे.
दिनांक 14 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान विशाळगड येथे हजरत मलिक रेहान यांच्या दर्ग्यावर विघ्न संतोषी जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली सदरच्या दगडफेकीमध्ये मुस्लिम समाजातील महिला तसेच हिंदू समाजातील महिला लहान मुले तसेच स्थानिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्याशिवाय गडावर राहणाऱ्या लोकांची घरे उध्वस्त केली असून तोडफोड केले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी गडावर येणाऱ्या जमावास विशाळगडापासून सहा किलोमीटर अंतरावर गजापूर येथे थांबवले त्यावेळी सदर जमावाने गजापूर येथील बंद घरांची कुलपे तोडून आत मध्ये घुसून प्रापंचिक साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे.
तसेच घरातील घरगुती गॅस सिलेंडरचे स्फोट घडवून आणले आणि आयुष्यभर काबाडकष्ट करून कमावलेल्या प्रापंचिक साहित्याला आग लावण्यात आली. काही क्षणात गजापूर येथील मुस्लिम समाजाची घरे उध्वस्त झाली एवढेच नव्हे तर जमावाने मुस्लिम समाजाची पवित्र मानल्या जाणाऱ्या मशिदीची तोडफोड केली आहे. तसेच या मशिदीत नमाज पडण्यासाठी वापरला जाणारा मुसलला यालाही आग लावण्यात आली. काहीनी तर अक्षरशः मुस्लिम धर्माचे पवित्र कुराण फेकून दिले. असा किळसवाना, विकृत प्रकार गजापूर येथे घडला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायर झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही असे असताना काही संतप्त माते पेरू जमावाने महाराजांच्या गडावर संविधान व कायदा धाब्यावर बसवून अविचाराने काळीज हेलावून टाकणारे निंदनीय कृत्य केले आहे. ज्या लोकांची घरी दारू उध्वस्त झाले आहे त्यांना शासनाकडून पाच लाख रुपये प्रति कुटुंब नुकसान भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे.
अतिक्रमण हटवणे ही शासनाची जबाबदारी आहे त्याला आमचा विरोध नाही परंतु मुस्लिम समाजाला टार्गेट केले जात आहे.जाणून बुजून मुस्लिम समाजातील निष्पाप लोकांची घरेदारे उध्वस्त केले जात आहेत. मशिदीचे नुकसान केले जात आहे. आग लावली जात आहे हे प्रकार निंदनीय असून त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सर्फुद्दीन बोबडे, हुसेन लांजेकर, अजीम बोबडे, अलिबा बोथरे, आयुब बोबडे, एम्तियाज बोबडे, हनीफ पाटणकर, सय्यद नाचरे, महंमदहनिफ रामदुल, समीर लांजेकर, याकूब नाचरे, यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.