मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत कुडाळ तालुका जिल्ह्यात अव्वल

कुडाळ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सिंधुदुर्ग विधानसभा निहाय एकूण 13,5,437 अर्ज प्राप्त झाले.13,1,527 अर्जाना मान्यता मिळाली आहे. कुडाळ तालुक्यात एकूण 26,223 इतकी नोंद होऊन कुडाळ तालुक्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले.

यात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या नेतृत्वात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली.अशी माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय समिती अध्यक्ष कुडाळ सुप्रिया वालावलकर आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय समिती सदस्य रुपेश कानडे यांनी दिली.

error: Content is protected !!