कर्तृत्ववान महिलांचा केला विशेष सन्मान
चौके (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत धामापूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी धामापूर सरपंच मानसी परब यांच्या हस्ते गावातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये माजी सरपंच तथा प्राध्यापिका मानसी धामापूरकर, अंगणवाडी सेविका शीतल नाईक, सुप्रिया धोपेश्वरकर, ग्रामसंघ अध्यक्षा जगिता नाईक, आशा सेविका शीतल वालावलकर या पाच महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, सदस्य प्रशांत गावडे, साक्षी नाईक, तेजस्विनी भोसले यांच्यासह कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या दिपा मेस्त्री, सिद्धी परब, जागृती भोळे, वर्षा सुतार, उषा थवी, सुप्रिया घाडी,प्राजक्ता दाभोलकर,निशा मेस्त्री , गीता सुतार,आणि गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सत्कार सोहळ्यानंतर महिलांनी मनोरंजनात्मक खेळ खेळून आणि सांस्कृतिक कार्यक्रम करून रोजच्या धकाधकीच्या जिवनातून एक दिवस वेळ काढत विरंगुळा अनुभवला.