करूळ चेकनाक्यावर वैभववाडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ चेक नाक्यावर १२ लाखाच्या गोवा बनावटीच्या दारुसह दारु वाहातूक करणारा ट्रक असा एकूण २० लाखाचा मुद्देमाल वैभववाडी पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रक चालक व क्लिनरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी राञी ८.४५ वा.सुमारास करण्यात आली.
करुळ चेक नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलिस हवालदार नितीन खाडे हे नेहमीप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्या वाहानांची तपासणी करित होते. दरम्यान गोव्याहून कोल्हापूरकडे जाणारा लेलॕड कंपनीचा ट्रक क्र. एमएच १२ एचडी २६४४ तपासणीसाठी थांबविला. ट्रकच्या हौदयात लपवून ठेवलेले फुट्याचे बाॕक्स आढळले. त्यांनी अधिक तपास केला असता बाॕक्समध्ये गोवा बनावटीची दारु असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत वैभववाडी पोलिस निरीक्षक अमित यादव यांना कल्पना दिली. त्यानंतर सदर दारु वाहातुक करणारा ट्रक वैभववाडी पोलिस ठाणेत आणून पंचनामा केला. त्यात तब्बल १२ लाखाची गोवा बनावटीची दारु सापडली. ट्रकचालक अमीर गुलाब तांबोळी वय २६ व रोहीत रोहिदास समदडे वय २२ रा. पाटोदा ता.जि.उस्मानाबाद या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांना गुरुवारी सकाळी कणकवली न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पो.ना.मारुती साखरे करीत आहेत.