कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे ग्रामपंचायत आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त सरपंच सुशिल कदम यांच्या संकल्पनेतून तरंदळे शाळा नं.1 येथे बहारदार कार्यक्रम पार पाडण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाचं उद्धगाटन ग्रामसेवक सौ.म्हाळकर ,मुख्याध्यापक सौ.कुलकर्णी,ग्रामपंचायत सदस्य वैशाली घाडीगावकर, सीएचओ सौ.रासम,अंगणवाडी सेविका सौ.शीतल,शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष सौ.घाडीगावकर,यांच्यावतीने करण्यात आला.मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.मान्यवर मध्ये सरपंच सुशिल कदम,तंटामुक्त अध्यक्ष जयसिंग नाईक,माझी सरपंच सुधीर सावंत,शाळा कमिटी अध्यक्ष रमाकांत देवलकर,ग्रामपंचायत सदस्य दीपक घाडी गावकर,ग्रामपंचायत सदस्य तेजस सावंत उपस्थित होते.त्यांचं स्वागत करण्यात आले.तरंदळे ग्रामपंचायत व लायन्स आय हॉस्पिटल कणकवली यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.ह्यावेळी तांबे डॉक्टर,त्यांचे सहकारी कोरडे सर आले होते.त्यांचं स्वागत ग्रामपंचायत वतीने सरपंच सुशिल कदम यांच्यावतीने शाल आणि श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेत लहान गट कब्बडी स्पर्धेत उपविजेता पद मिळाल्या बद्दल त्यांचं सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.गावातील महीलाचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला ह्यावेळी महिलांनी एकत्रित खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम यशस्वी पार पाडला.दुपारी महिलांचा व त्यात तरंदळे गावात पहिल्यांदा विधवा महिलांना त्यांचा हक्क त्यांचा सन्मान देण्यासाठी त्यांना सहभागी करून हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.त्याला सुध्दा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला.गावातील कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला.ह्यावेळी पहिलं प्राधान्य ज्यांनी गावासाठी 5 वर्षाचा अमूल्य वेळ देवून गावाचा विकास करण्यासाठी मोलाचं हातभार लावला असे महिला सरपंच 4 पुढील प्रमाणे.जयमाला आचरेकर.2अर्चना सावंत रेखा मोंडकर,4.नम्रता देवलकर. यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच सुशिल कदम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महिला पुरुष समानता असली पाहिजे महिलांवर अत्याचार होत असतील तर त्यावर महिलांनी एकत्रित येवून आवाज उठविला पाहिजे.फक्त एकच दिवस महिला दिवस नसून सर्वच दिवस महीलान साठी आहेत.माता सावित्री ह्यांचा त्याग महिलांनी विसरता कामा नये.8 मार्च का साजरा केला जातो त्याचा अभ्यास पण महिलांनी केला पाहिजे.भारतीय संविधानात महिलांसाठी विशेष आरक्षण दिलं आहे त्याचा सुध्दा त्यांनी अभ्यास करून आपल्या स्वतः साठी,गावा साठी मोलाची कर्तबगारी दाखवावी अस आव्हान सरपंच यांनी केलं आहे.ह्यावेळी सर्वांचं आभार मानण्यात आले.कार्यक्रमासाठी उपस्थित सरपंचसुशिल कदम,उपसरपंच शुभावलि सावंत,तंटामुक्त अध्यक्ष जयसिंग नाईक,माझी सरपंच सुधीर सावंत,(ग्रामपंचायत सदस्य तेजस सावंत, दीपक घाडी गावकर,श्रीमती वैशाली घाडी गावकर,संजना राणे,मुख्याध्यापक कुलकर्णी मॅडम,शिक्षक पोकळे,तेलदेवकर ,डोईफोडे,अंगणवाडी मदतनीस सावकरीन ,ग्रामसेवक म्हालकर,सीएच ओ रासम,ग्रामपंचायत लिपिक अभय सावंत, डेटा ऑपरेटर वनिता कदम,ग्रामपंचायत शिपाई गावकर,शाळा व्यवस्थापन उपाध्यक्ष घाडी गावकर मॅडम,ग्रामस्थ,गावातील महिला, व बालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
यावेळी महिला दिनानिमित्त सरपंचसुशिल कदम यांनी महिला दिनाच्या खूप शुभेच्छा दिल्या.गावातील सर्व बचत गट,ग्राम संघ समूह,आशा वर्कर,गावातील महिलांना एकत्रित मिळून गावा साठी प्रेरणा देणारे काम करावं. रोजगार उपलब्ध करण्यासाठी उपाय योजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व महिलांनी खूप मेहनत घेतली त्यासाठी त्यांचं आभार मानण्यात आले.

















