रविवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते १ होळीचा मांड कोकिसरे बांधवाडी येथे रक्तदान शिबीर होणार संपन्न
चाकरमानी व युवकांनी रक्तदान शिबीरात सहभागी व्हावे – प्रविण पाळये
वैभववाडी (प्रतिनिधी) : शिंगुदेवी युवा मंडळ बांधवाडी आणि सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ८ सप्टेंबर २०२४ रोजी ठिक सकाळी ८ ते दुपारी १वा पर्यंत होळीचा मांड कोकिसरे बांधवाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजित करण्यात आले आहे. तरी या रक्तदान शिबीरात तालुक्यातील चाकरमानी, युवकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन शिंगुदेवी युवा मंडळ बांधवाडीचे अध्यक्ष प्रवीण गुणाजी पाळये यांनी केले आहे नाव नोंदणी व अधिक माहिती ९९३०९५६२०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.