गणेश भक्तांच्या सेवेसाठी आरोग्य पथक कार्यरत
खारेपाटण (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थी साठी कोकणात येणाऱ्या मुंबईकर चाकरमानी तथा गणेश भक्तांच्या सेवेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण टाकेवाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने व पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीने स्वागत कक्ष तसेच मोफत चाह बिस्कीट वाटप व विश्रांती गृह तसेच आरोग्य पथक तैनात करण्यात आले असून खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे विशेष आरोग्य पथक खास करून गणेश भक्तांच्या सेवेसाठी कार्यरत ठेवण्यात आले आहे. याचा लाभ गणेशभक्त मोठ्या संख्येने घेत आहेत.
गणेश भक्तांच्या स्वागतासाठी खारेपाटण टाकेवाडी येथे उभारण्यात आलेल्या मोफत सुविधा केंद्रामध्ये तथा स्वागत कक्षात पोलीस मदत केंद्र,आरोग्य पथक, जिल्ह्याची पर्यटन दृष्ट्या ठळक माहिती देणारी आर्ट फोटो गॅलरी,विश्रांती गृह, मोफत चहा बिस्कीट व पाणी वाटप आदी सेवा कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत. तर कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंगवले मॅडम यांचे आदेशान्वये व खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण टाकेवाडी गणेशभक्तांच्या सेवेसाठी आरोग्य पथक कार्यरत ठेवण्यात आले असून या आरोग्य पथकात खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी डॉ. धनश्री जाधव (सी. एच. ओ. ), आरोग्य सहाय्यक पी एस भागवत, आरोग्य सेवक आर. जी. नायकोजी काम करत आहेत. तर खारेपाटण पोलीस दूरशेत्राचे बिट अंमलदार उद्धव साबळे पोलीस कॉन्स्टेबल पराग मोहिते तसेच वाहतूक पोलीस कर्मचारी देखील गणेश भक्तांच्या सेवेसाठी खारेपाटण येथे आपले कर्तव्य बजावत आहेत.