अविनाश पाटील यांची फणसगाव च्या पोलीस पाटील पदी नियुक्ती

भाजपा तालुकाध्यक्ष महेश नारकर यांच्या रिक्तपोलिस पाटील पद भरण्याच्या मागणीला यश

तळेरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील फणसगाव च्या पोलीस पाटीलपदी अविनाश सुरेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फणसगाव गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटील नियुक्ती गणेशोत्सव सणापूर्वी करावी अशी आग्रही मागणी भाजपा तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी केली होती. निवड झालेल्या पात्र उमेदवारांमधून पोलीस पाटील नियुक्ती मागील काही प्रलंबित होती. अखेर प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी फणसगाव गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटीलपदी अविनाश पाटील यांना नियुक्ती दिली आहे. स्वतंत्र पोलीस पाटील मिळाल्यामुळे प्रशासकीय कामकाज, विविध दाखले, महसूल तसेच पोलीस प्रशासनाची कामे करताना सोयीचे होणार आहे. याबाबत फणसगाव ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!