खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेज खारेपाटण येथे ५ सप्टेंबर रोजी “शिक्षक दिन” मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सत्यवान माळवी साहेब व त्यांचे सहकारी अनिल सानप साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला प्रशालेचे मुख्याध्यापक सानप सर आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी मुख्याध्यापक कुमारी पूर्वा ईसवलकर व पर्यवेक्षक कुमार सोहम कोलते यांनी स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. विद्यार्थी शिक्षक,विद्यार्थी मुख्याध्यापक, विद्यार्थी पर्यवेक्षक, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून आजच्या संपूर्ण दिवसाचे कामकाज पाहिले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जूनियर कॉलेज मधील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या आजच्या कामकाजाचा अनुभव आपल्या भाषणांमधून व्यक्त केला. आजच्या या शिक्षक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे,उपाध्यक्ष भाऊ राणे व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी जुनियर कॉलेजच्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अशा रीतीने खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.